मुळशीतील सर्व खासगी हाॅस्पिटलने दर्शनी भागात शासकीय मान्यतेचे फलक लावण्याची स्वराज्य पक्षाची मागणी.
जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई यांना समक्ष भेटून स्वराज्य पक्षाच्या वतीने दिले निवेदन.
कोळवण (तारीख, १ फेब्रुवारी गुरुवार) ता. मुळशी.
पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा ओरोग्य अधिकारी सचिन देसाई यांना स्वराज्य पक्षाकडून पुणे जिल्हा निमंत्रक राजू फाले यांनी निवेदनाचे पत्र देवून मागणी केली की, मागील महिन्यात १४ जानेवारी रोजी मुळशी तालुक्यात भरे येथील नवले हॉस्पिटल च्या डॉ. लता ववले यांच्याकडे पिरंगुट माधील सुरेखा गोळे यांना प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते डॉ. ववले यांच्या अक्षम्य हलगर्जीपणाने सुरेखा गोळे यांची प्रसूती होण्यासाठी सिझेरियन करण्यात आले. सिझेरियन नंतर सुरेखा यांना रक्तस्त्राव झाला याकडे दूर्लक्ष केल्याने सात तासानंतर सुरेखा यांना घाईघाईत रुग्णवाहिकेने दिनानाथ हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले परंतू अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचार सूरु होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला व नवजात बालक आईच्या प्रेमास काहीच दोष नसताना मुकले आहे.
![]() |
मुळशीत कोणीही हॉस्पिटल चालू करताना रीतसर परवाना घेतात का? तसेच परवाना असल्याचा फलक संबंधीत हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावतात का, प्रत्येक हॉस्पिटल मध्ये किती बेड आहेत, आय सी यू सुविधा आहेत का? या सर्व बाबींची समीती नेमून तत्काळ चौकशी करुन तसा अहवाल मागवण्यात यावा. ववले हॉस्पिटलच्या डाॅ.लता ववले यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.लता ववले यांची वैद्यकिय सनद व शिक्षण काय आहे, त्यांच्या हॉस्पिटलला शासकीय मान्यता आहे का, त्यांनी सुरेखा गोळे यांच्या प्रसूती दरम्यान कोणते भूलतज्ज्ञ बोलावले, सिझेरियन साठी बोलावलेले डॉक्टर यांची माहीती मागवावी सुरेखा गोळे हिची प्रसूती झाल्यावर रक्तस्त्राव होवून मृत्यू झाला त्याकडे डाॅ. ववले यांनी का दूर्लक्ष केले, या हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक असणारे क्रिटीकल आय सी यू बेड नसताना, तसेच रुग्णाला कोणतीही शस्त्रक्रिया करण्याअगोदर त्याच्या रक्तागटाचे पुरेशा प्रमाणात रक्त हॉस्पिटल मध्ये मागविले होते का, याची चौकशी व्हावी.
या सर्व गंभीर बाबी आता आता मयत सुरेखाच्या मृत्यूने समोर येत आहेत. तालुक्यात बेकायदेशीर परवानगी न घेता हॉस्पिटल्स चालत असतील तर अशी हॉस्पिटल्सला कोणाचे आशिवीद आहेत या गोष्टीची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली, यावेळेस स्वराज्य पक्षाचे पुणे जिल्हा निमंत्रक राजू फाले, प्रतीक साखरे, अक्षय बुचडे, चैतन्य हुलावळे, मंगेश जजांभूळकर,स्वप्नील साखरे,अमोल चव्हाण, नाथा चोरघे, उपस्थित होते.