पोलिस मित्र संघटनेची सभा उत्साहात संपन्न
पत्रकार -नारायण लोहार
कोल्हापूर - आज दिनांक ५फेब्रुवारी रोजी तायकोंदो सभागृह आपटेनगर, कोल्हापूर येथे कोल्हापूर पोलीस मित्र संघटनेची सभा मोठ्या उत्साहात पार पडली .प्रथम कोल्हापूर पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष संभाजी पाटील, कार्याध्यक्ष अभिषेक आंबोळे, वैशाली झांजगे, अध्यक्षा आश्लेषा चव्हाण, संपर्कप्रमुख प्रवीण बेडक्याळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला.कोल्हापूर पोलिस मित्र संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप गवळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
![]() |
| महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेचे सचिव डॉ.सुशील अग्रवाल व राज्य कार्याध्यक्ष डॉ.सुरेश राठोड , कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी |
संघटनेतील जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी यांनी आपला परिचय करून दिला.आपल्या पदाचे काम काय असते याची माहिती कोल्हापूर पोलीस मित्र संघटनेचे संघटक सागर शेळके यांनी करून दिली.कार्याध्यक्ष संभाजी पाटील यांनी संघटनेच्या माध्यमातून आपण सर्वांनी समाजकार्य करणे हे आपले मुख्य ध्येय असले पाहिजे.जिथे अडचणी निर्माण होतात तिथे पोलिस मित्र पोहचला पाहिजे.लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण आहोत याची जाणीव ठेवली पाहिजे.कार्याध्यक्ष अभिषेक आंबोळे यांनी संघटनेचे महत्त्व विशद केले.सभेला सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंतीवजा सुचना केली.
आपण सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे.संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.पोलिस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ.सुशील अग्रवाल सर यांनी आपण वेळेला फार महत्त्व दिले पाहिजे.सभेला नियोजित वेळेत उपस्थित राहावे तसेच संघटना वाढीसाठी शुभेच्छा दिल्या.यानंतर पोलीस मित्र संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष डॉ.सुरेश राठोड सर पदाधिकारी यांना आपणास दिलेल्या पदाचे महत्त्व काय आहे.आपली जबाबदारी कोणती? एकमेकांना सहकार्य करून संघटनेत काम करणे आवश्यक आहे.सभेला येताना लोकेशनचा वापर करावा.पदाधिकार्ऱ्यांच्या शंकेचे निरसन योग्य पद्धतीने केले.
भुदरगड तालुका संघटक लहू कांबळे यांच्या मातोश्रीना श्रद्धांजली वाहिली.अनेक पदाधिकारी यांनी आपल्या शंका उपस्थित केल्या.त्या शंकांचे योग्य पद्धतीने डॉ.सुरेश राठोड सर यांनी निरसन केले.या कार्यक्रमाची बैठक व्यवस्था, चहा पाणी व्यवस्था जिल्हा उपाध्यक्ष दिलीप गवळी सर यांनी केली.या कार्यक्रमास महिला जिल्हापदाधिकारी , तालुका महिला पदाधिकारी तसेच राज्य सचिव डॉ.सुशील अग्रवाल सर, राज्य कार्याध्यक्ष डॉ.सुरेश राठोड सर, जिल्हा अध्यक्ष संभाजी पाटील, आश्लेषा चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष अभिषेक आंबोळे, वैशाली झांजगे, संपर्क प्रमुख प्रवीण बेडक्याळे, जिल्हा संघटक सागर शेळके सर, उपाध्यक्ष दिलीप गवळी सर,शहर महिला अध्यक्षा, उपाध्यक्षा त्याचबरोबर इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.शेवटी करवीर तालुका प्रसिद्धी प्रमुख नारायण लोहार यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
