सेलूत सकल् मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन
------------------------------------------
सेलू(गणेश साडेगावकर)
आज सेलू येथे सकल मराठा समाज सेलू तालुका च्या वतीने रायगड कॉर्नर येथे सकाळी दहा वाजता रस्ता रोको अंदोलन करण्यात आले.
![]() |
मराठा क्रांती योद्धा श्री मनोज जरांगे पाटील याच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी संकल मराठा समजा तर्फे गेल्या सहा दिवसापासून साकळी उपोषण तसेच आमरण उपोषण करण्यात येत आहे. मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि ओबीसी मध्ये समावेश करावा या साठी रस्ता रोको करण्यात आला. या मुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
या आंदोलनात सेलू तालुक्यातून मोठ्या संख्येने महिला भगिनीनी सहभाग घेतला होता. एक मराठा लाख मराठा च्या जयघोष्याने सारा परिसर दणाणून गेला होता.
![]() |
अतिशय शांततेत चाललेल्या या मोर्च्याची सुरुवात मोटार सायकल रॅली काढून करण्यात आली. यात शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते. मराठा समाज हाअल्पभुधारक समाज आहे.शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत ,नौकरी मिळत नाही त्या मुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. त्या मुळे आरक्षणाच्या माध्यमातून समाज् सक्षम बनवला जाऊ शकतो परंतु शासन या बाबत वेळ काढू पणा करत आहे. म्हणून,शासनाला जागे करण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी तहसीलदार दिनेश् झाम्पले यांना निवेदन देण्यात आले.