प्रा. डॉ. बाबुराव घुरके यांना ‘राज्यस्तरीय उपक्रमशील प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान

Maharashtra Samachar
0



कोल्हापूर : दि. ०२.०१.२०२४

कोल्हापूर प्रतिनिधी


समाजमनाचा भान जपणाऱ्या साप्ताहिक ‘गरुडभरारी’ च्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त गरुडभरारी एज्युकेशनल अँण्ड सोशल फौंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने गरुडभरारी शैक्षणिक दिनदर्शिका प्रकाशन व विविध क्षेत्रातील १० राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण ऐतिहासिक शाहू स्मारक भवन येथे रविवार दि.३१ डिसेंबर २०२३ रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर येथील भूगोल व पर्यावरण विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. बाबुराव घुरके यांना ‘राज्यस्तरीय उपक्रमशील प्राध्यापक पुरस्कार-२०२४’ ने सन्मानित करण्यात आले. 




राज्यस्तरीय उपक्रमशील प्राध्यापक पुरस्कार प्रा. डॉ. बाबुराव घुरके यांना प्रदान करताना करताना ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे डावीकडून बाळ डेळेकर,माजी खा. राजू शेट्टी, शारंगधर देशमुख, पी के पाटील,अनिल चव्हाण, रवींद्र मोरे आदी.

          गरुडभरारी एज्युकेशनल अँण्ड सोशल फौंडेशन कोल्हापूर च्या वतीने दरवर्षी वर्धापनदिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. याच अनुषंगाने प्रा. डॉ. बाबुराव घुरके यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रमुख पाहुणे मा.खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे आणि कोजिमाशि पतसंस्था व्हा. चेअरमन श्री. प्रकाश कोकाटे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते ‘राज्यस्तरीय उपक्रमशील प्राध्यापक पुरस्कार-२०२४’ हा मानपत्र, सन्मान चिन्ह, कोल्हापुरी फेटा, शाल व पुष्पगुच्छ  देऊन प्रदान करण्यात आला. 


       ‘कमवा व शिका’ योजनेतून आपले उच्च शिक्षण पूर्ण करून कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना नेट, पीएच.डी पर्यंतचे शिक्षण स्वबळावर पूर्ण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. ग्रामीण, दुर्गम-डोंगरी भागातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रबोधन करून शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देवून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असणाऱ्या अनेक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. कोरोना काळात ग्रामीण भागातील जनतेत जनजागृती करून कोरोनाविषयी असणारे गैरसमज दूर केले आहेत. व्यक्तिमत्व विकास, सामाजिक विकास, ग्राम विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ग्राम स्वच्छता अभियान, दारूबंदी, प्लास्टिक बंदी, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन व जनजागृती इ. विविध विषयांवर प्रबोधनात्मक व्याख्याने देऊन अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत आहेत. 


            शिवाजी विद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धेत सलग तीन वेळा यश व दोन वेळा राज्यस्तरावरील संशोधन स्पर्धेत स्वतः सहभागी झाले आहेत. आविष्कार संशोधन स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत अनेक संशोधन पत्रिकांचे सादरीकरण करून ३० पेक्षा जास्त संशोधन पेपर्स विविध जर्नल्स मधून प्रकाशित झाले आहेत. गरजूंना सहकार्याची भावना हा आपल्या जीवनाचा स्थायीभाव समजून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. 


          शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सौ. सरोज पाटील (माई), महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन सौ. संगीता प्रशांत पाटील, प्राचार्य डॉ. एल. डी. कदम, कला व वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. सिंधू आवळे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. प्रकाश चौगुले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शकील शेख, भूगोल विभागप्रमुख डॉ. मुकुंद कदम, सहयोगी प्राध्यापक व भूगोल विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. हजारे (एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई), शिक्षक नेते श्री.दादासाहेब लाड, गरुडभरारीचे मुख्य संपादक श्री.अनिल चव्हाण, प्रा. विनायक यादव, यीनचे सहाय्यक व्यवस्थापक अवधूत गायकवाड, श्री.रामदास वरक (गोवा), पत्रकार सुभाष भोसले आदीं मान्यवरांनी अभिनंदन केले. 


           या कार्यक्रमास कॉंग्रेस गटनेते व मा.नगरसेवक शारंगधर देशमुख, लोकराज्य जनता पार्टी जिल्हाध्यक्ष पी. के. पाटील, कोजिमाशि पतसंस्था चेअरमन बाळ डेळेकर, कोजिमाशि पतसंस्था व्हा.चेअरमन प्रकाश कोकाटे, वरिष्ठ पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. टी. एस. कडवेकर, कार्यकारी संपादक सुनील चव्हाण, उपसंपादक रविंद्र मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top