पेठ वडगांव येथील श्री. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप संचलित श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर काॅलेजच्या पटांगणावरती हातकणंगले तालुकास्तरीय १४,१७,१९ वयोगटातील मुले व मुली यांच्या खो खो स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेत तालुक्यातील १२० संघांनी सहभाग घेतला.
स्पर्धेतील विजेते १४ वर्षांखालील मुली प्रथम क्रमांक: किणी हायस्कूल किणी,मुले प्रथम क्रमांक: ए.बी.पी.पारगांव,
१७ वर्षांखालील मुली प्रथम क्रमांक :जनता माध्यमिक हुपरी,
१९ वर्षाखालील मुली
प्रथम क्रमांक: श्री. बळवंतराव यादव ज्युनिअर काॅलेज पेठ वडगांव,
मुले प्रथम क्रमांक :ए.बी. पी,नवे पारगांव.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. सचिन कोंडेकर श्री. शिवाजी पाटील, श्री. संतोष भोसले तालुका समन्वयक हे उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संतोष पाटील सर व सुत्रसंचालन प्रा.सुनिल पायमल तर आभार क्रींडा शिक्षक
श्री. हरिश्चंद्र गायकवाड, खो खो समन्वयक यांनी मानले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खो खो असोसिएशन,क्रींडा शिक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.