हेरलेत सकल महिलांसाठी सामुदायिक महाकुंकुमार्चन उपासना सोहळ्याचे आयोजन
हेरले (तालुका-हातकणंगले) येथे हिंदू युवा संघटना यांच्यावतीने सोमवार दिनांक २३/१०/२०२३ रोजी संध्याकाळी ४:३० वां. श्री नागोबा मंदिर हेरले येथे सकल महिलांसाठी सामुदायिक महाकुंकूमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हातकणंगले तालुक्यातील सर्वात मोठा कुंकूमार्चन सोहळा पार पडणार आसून या कुंकुमार्चन सोहळ्यासाठी अधिकाधिक संख्येने स्त्रियांनी उपस्थित राहून देवी कृपेचा लाभ घ्यावा असे आवाहन हिंदू युवा संघटना यांनी केले आहे.