उंब्रज ग्रामस्थांकडून सपोनि प्रशांत बधे यांचा सत्कार

Maharashtra Samachar
0

 उंब्रज ग्रामस्थांकडून सपोनि प्रशांत बधे यांचा सत्कार


उंब्रज विभाग प्रतिनिधी/ रघुनाथ थोरात



उंब्रज,ता.कराड येथील पोलीस स्टेशनचे सपोनि प्रशांत बधे यांचा उंब्रज ग्रामस्थांनी सत्कार करीत आभार मानले आहेत.नुकत्याच होऊन गेलेल्या गणेशोत्सवात उंब्रज शहर व पंचक्रोशीत उंब्रज पोलीस स्टेशन यांनी उल्लेखनीय कामगिरी पार पाडली होती. काही दिवसांपूर्वी पुसेसावळी येथे  दुर्दैवी घटना घडून गेल्यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवरती होते.जातीय सलोखा राखणे,गणेश मंडळांच्या सभासदांवर अंकुश ठेवून भांडण तंटा होणार नाही अशी दुहेरी कसरत यावेळी पोलिसांना करावी लागली होती. कमी पोलीस संख्या असताना देखील सुयोग्य नियोजन केल्याने अगदी उत्साहात व शांततेत हा उत्सव पार पाडण्यात उंब्रज पोलीस स्टेशन यशस्वी झाले होते. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यानी सपोनि प्रशांत बधे व उंब्रज पोलीस स्टेशन यांचा सत्कार घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांना धन्यवाद दिले.

यावेळी  उंब्रज ग्रामपंचायत सरपंच,सदस्य,सर्व गणेश मंडळांचे कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार बंधु व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top