महावितरणकडून ‘एक उपकेंद्र-एक दिवस’ मोहिम

Maharashtra Samachar
0

 महावितरणकडून ‘एक उपकेंद्र-एक दिवस’ मोहिम

 


प्रतिनिधी -संभाजी चौगुले

कोल्हापूर परिमंडळ : अखंडित व दर्जेदार वीजसेवेसाठी महावितरणच्या परिते उपविभागातील ३३/११ के.व्ही कांचनवाडी व वडकशिवाले उपकेंद्रामध्ये ‘एक उपकेंद्र-एक दिवस’ हा उपक्रम राबविण्यात आला. ११०/३३ के.व्ही कोथळी उपकेंद्राच्या देखभाल व दुरुस्तीचे काम असल्याने (दि.9 ऑक्टोबर रोजी) ३३ के.व्ही. वडकशिवाले व कांचनवाडी फिडर बंद राहणार होते.  हात धोका ओळखून  या समयसूचक व चोख नियोजन केले. ग्राहकांना पुन्हा वीज बंदचा करावा लागणारा सामना टळला.


                     कोल्हापूर ग्रामीण विभाग १ चे कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता रत्नाकर मोहिते यांच्यासह सर्व शाखा अधिकारी, यंत्रचालक व जनमित्र यांनी ३३/११ के.व्ही कांचनवाडी व वडकशिवाले उपकेंद्रातील काम पूर्ण केले. ‘एक उपकेंद्र-एक दिवस’ अंतर्गत कदमवाडी उपविभागातील ३३/११ केव्ही केर्ले उपकेंद्रात रिले तपासणी, बुशिंग सफाई, रोहित्र ऑईल पातळी तपासणी, कृषी फिडरचे जंप बदलणे इ. तांत्रिक देखभाल दुरूस्ती व परिसर स्वच्छतेची  कामे करण्यात आली. आजरा उपविभागात वितरण रोहित्रे व खांबावरील वेली काढणे, विद्युत वाहिन्यांवरील झाडांच्या फांद्या छाटणे अशी कामे करण्यात आली. महावितरणच्या क्षेत्रीय यंत्रणेकडून विद्युत उपकेंद्रातील तांत्रिक दुरुस्ती कामासह ठिकठिकाणी विद्युत यंत्रणेतील वितरण रोहित्र, विजेचे खांबावर, वाहिन्यावर वाढलेल्या वेली, झाडांच्या फांद्या हटविण्याची कामे सध्या महावितरणकडून सुरु आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top