गौरी कांबळे ची ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी इंटर झोनल शूटिंग कॉम्पिटिशन साठी निवड
शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या
आंतर विभागीय दहा मीटर एअर रायफल शूटिंग स्पर्धा या शुक्रवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी झाल्या त्यामध्ये आपल्या ड्रीम ओलंपियन रायफल अँड पिस्टल शूटिंग अकॅडमीची नेमबाज खेळाडू गौरी संदीप कांबळे हीने 97,99,100,100 असे 400 पैकी 396 स्कोर करत अत्यंत चुरशीने तृतीय क्रमांक पटकावला त्यामुळे तिची दिल्ली येथे होणाऱ्या मानव रचना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड स्टडीज फरीदाबाद यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी इंटरनल शूटिंग कॉम्पिटिशन साठी निवड झाली आहे.
ती सध्या गांधीनगर निगडे वाडी येथील ड्रीम ओलंपियन शूटिंग अकॅडमी येथे नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे .तिला प्रशिक्षका आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुराधा खुडे व समीर मुलानी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.