सरकारने दिलेला शब्द पाळावा, आम्हीही दिलेला शब्द पाळतोय-जरागे पाटील
-------------------------------
सेलूत जाहीर सभा- लाखोची उपस्थिती
सेलू (गणेश साडेगावकर )
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज अन्याय सहन करत आला आहे. वेळोवेळी सरकार कडून मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे. परंतु आता मराठा समाज जागृत झाला आऊंगा आता भूल थापान बळी पडणार नाही. आम्ही शब्द पाळला असून सरकारनेही दिलेला शब्द पाळावा,असे प्रतिक्रिया मराठा समाजाचे नेते मनोज जरागे पाटील यांनी केले आहे.
दोन महिन्या पूर्वी सरकारच्या प्रतिनिधी सोबत आलेल्या शिष्ट मंडळाने दिलेली चार शब्द आमच्या साठी महत्वाचे आहेत . त्या मुळे ऱ्यांनी लिहून दिलेल्या शब्दाची जो पर्यत पूर्तता होत नाही तो पर्यत उपोषण चालूच राहणार असल्याची प्रतिक्रिया मनोज जरागे यांनी दिली.सेलू येथील बाहेती मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आज दि 22.डीसेंबर रोजी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की दोन महिण्यापुर्वी लिहून दिलेल्या लिखी उत्तरात चार शब्द लिहून दिलेले आहेत यातील एक शब्द मी 24 तारखेला पढील दिशा ठरवताना जाहीर करणार आहे.
तर 1967 च्या नोदी नुसार त्यांचा सर्व परिवार, सगे सोयरे, रक्ताचे नातेवाईक यांना सर्वांना कुणबी प्रमाण पत्र देण्यात येईल, असे सरकार कडून लेखी उत्तरात देण्यात आले होते. मात्र 21 डिसें. रोजी सरकार कडून प्रतिनिधी म्हणून आलेले गिरीश महाजन, संदीपान घुमरे व उदय सामंत यांच्या सोबत पण तास सगे सोयरे या एकाच शब्दावर झाली.त्यामुळे सरकारने जे लीहून दिले आहे त्या शब्दा वरच मी ठाम आहे. आणि त्यांना तो पाळावा लागेल.सरकारने जे लिहून दिले आहे ते हो मी मागत आहे अशी ग्वाही मनोज जरागे यांनी दिली. दि.23 रोजी बीड येथे आयोजित सभेपूर्वी सरकारने पूर्तता केली नाही तर दि. 24 रोजी आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली जाईल. असेही ते म्हणाले.
144 कलम लागू करणे, नोटीस पाठवणे असे शडयंत्र चालवले आहे. किती पिढ्या नंतर एखादा जण समुदाय एकत्र आला आहे तो कसा तुटेल यासाठी सरकार प्रयन्त करत आहे,पण सरकारने असे प्रयन्त केल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा जरागे यांनी दिला आहे.
आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसात मागे घेऊ असा शब्द सरकारने दिला होता परंतु दोन महिने उलटून देखील अजून गुन्हे मागे घेतले नाहीत. मुंबईला येण्याची घोषणा केली नसताना सुद्धा नोटीस पाठवून मुंबईला आम्ही यावे असे प्रयत्न सरकार कडून केले जात असल्याचे त्यांनी या वेळी आरोप केला आहे.