मराठा आरक्षणासाठी सेलूत जाहीर महासभा (सर्व समाजाची व्रजमुठ)
-----------------------------------------
सेलू (गणेश साडेगावकर)
मराठा आरक्षणासाठी मा. मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी जि.जालना येथे होणा-या जाहीर महासभेच्या तयारी करीता आज सकल मराठा समाज सेलू तालुक्याची बैठक संपन्न झाली.
या बैठकीची सुरुवात ज्यांनी गेल्या वीस दिवसांपासुन साखळी उपोषणाच्या माध्यमातून सेलू तालुक्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची "ज्योत" तेवत ठेवली. त्या रायपूर येथील मराठा बांधवांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. दि. १४ आँक्टोबरला अंतरवाली येथे होणाऱ्या महासभेत सेलू तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून या तयारीचा आढावा घेऊन तयारी करण्यात आली. तसेच अंतरवाली येथील महासभेत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन व सेलू तालुका जालना जिल्ह्याच्या सिमेवर असल्याने अपवादात्मकरित्या आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मोफत चार रुग्ण वाहिकांची व्यवस्था करण्यात आली. व महासभेत जाणाऱ्या बांधवासाठी आहेर बोरगाव येथील ग्रामस्थांनी ११००००/- पुरी भाजी व बांटलीबंद पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच सेलू शहरात प्रचार-प्रसारासाठी होर्डिंग्ज उभारणी करण्यात येणार असुन इतर जिल्ह्यातून आलेल्या समाज बांधवांच्या सोयीसाठी आवश्यक ती उपाययोजना आखण्यात आली. याप्रसंगी तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील समाज बांधव उपस्थित होते.

