कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम
के.एम.टी. 'श्री दुर्गादर्शन' विशेष बस सेवेचा तिकीट विक्री शुभारंभ संपन्न
कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत रविवार दि.15/10/2023 ते सोमवार दि.23/10/2023 या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सवानिमित्य भाविक प्रवाशांच्या सोईसाठी 'श्री दुर्गादर्शन विशेष बस सेवा' सुरु करणेत येत आहे. या विशेष बस सेवेचा आगाऊ आरक्षण तिकीट विक्रीचा शुभारंभ शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडील पोलीस निरिक्षक श्री.नंदकुमार मोरे यांचे शुभहस्ते के.एम.टी.च्या श्री शाहू मैदान पास वितरण केंद्र येथून करणेत आला.
यावेळी प्रथम पास खरेदी करणेसाठी श्री. व सौ.प्रियांका प्रशांत पाटील, श्री. व सौ.अपर्णा आनंदा शिंदे, श्री. व सौ.अनुराधा रमेश उंडाळे, सौ.शांताबाई यादव, सौ.शुभांगी पाटील, सौ.मनिषा कोळी, सौ.शुभांगी मामुलकर, सौ.पार्वती ढाकरे, असे भाविक प्रवासी तसेच दुर्गादर्शन बस सेवा इनचार्ज सुनिल जाधव, वाहतूक निरिक्षक रवि धुपकर, सहा.वाहतूक निरिक्षक सुनिल पाटील, प्र.वाहतूक नियंत्रक अरुण घाटगे, पुरुषोत्तम साबळे, श्रीकांत सरनाईक, रफिक वडगावे, नंदकुमार काळे, उदय केळसकर, हेमंत हेडाऊ, अर्जुन चौगुले, मोहन मुदगूण, तसेच के.एम.टी. कर्मचारी व प्रवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी के.एम.टी.कडे प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त होत असलेने ज्येष्ठ चालक कर्मचारी श्री.दशरथ आण्णा मंडले यांचा सत्कार शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडील पोलीस निरिक्षक श्री.नंदकुमार मोरे यांचे शुभहस्ते करणेत आला.