बालिंगा योजनेवर अवलंबून असणा-या भागात शनिवार पासून एक दिवस आड पाणी पुरवठा

Maharashtra Samachar
0

बालिंगा योजनेवर अवलंबून असणा-या भागात शनिवार पासून एक दिवस आड पाणी पुरवठा


प्रतिनिधी - संभाजी चौगुले

कोल्हापूर ता.12 : शहर पाणी पुरवठा विभागाकडून बी, सी, डी व ई वॉर्डमधील बालिंगा योजनेवर अवलंबून असणा-या भागातील नागरीकांना शनिवार, दि.14 ऑक्टोंबर 2023 पासून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.

 


सन 2023 मध्ये नियमित पावसाच्या अभावी धरणक्षेत्रामधील पाणी साठा दिवसें-दिवस कमी होत असल्याने नदीपात्रामध्ये पाण्याची पाण्याची पातळी कमी होत आहे. भविष्यातील पाणी टंचाई विचारात घेता शहराला पुरेसा पाणी पुरवठा योग्य दाबाने होण्यासाठी व पाणी टंचाई परिस्थिती पुर्ववत होईपर्यंत एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.


यामध्ये आझाद गल्ली, मटन मार्केट, लक्ष्मीपुरी परिसर, शाहूपुरी 5, 6, 7, व 8 वी गल्ली, कामगार चाळ, सुभाषरोड, चांदणी चौक, रविवार पेठ, सुतार वाडा, खानविलकर पेट्रोल पंप, अकबर मोहल्ला, साळी गल्ली, महाराणा प्रताप चौक, शाहूपुरी कुंभार गल्ली, बाराइमाम परिसर, भवानी मंडप परिसर, सब जेल परिसर, मिरजकर तिकटी, महालक्ष्मी नगर, टेंभी रोड, सावित्रीबाई फुले दवाखाना परिसर या भागात शनिवार, दि.14 ऑक्टोंबर 2023 पासून एक दिवस आड पाणी होणार आहे. तर महाद्वाररोड, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, ब्रम्हेश्वर बाग, तटाकडील तालीम, चंद्रेश्वर, संध्यामठ, फुलेवाडी, रंकाळा टॉवर, शिवाजी पेठ काही भाग, गुजरी, दत्त गल्ली, लक्ष्मी गल्ली, गंगावेश, दुधाळी, पंचगंगा रोड, लोणार चौक, पापाची तिकटी, बुरुड गल्ली, सोन्या मारुती चौक, शिपुगडे तालीम, पिवळा वाडा, डोरले कॉर्नर, सिद्धार्थनगर, ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर, लक्षतीर्थ वसाहत, बलराम कॉलनी इत्यादी भागातील नागरीकांना रविवार, दि.15 ऑक्टोंबर 2023 रोजी पासून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी या भागातील नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top