कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम
दि.10/10/2023.
प्रतिनिधी - संभाजी चौगुले
के.एम.टी.ची 'श्री दुर्गादर्शन' विशेष बस सेवा दि.15 ऑक्टोबरपासून सुरु
कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत रविवार दि.15/10/2023 ते सोमवार दि.23/10/2023 या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सवानिमित्य भाविक प्रवाशांच्या सोईसाठी 'श्री दुर्गादर्शन विशेष बस सेवा' सुरु करणेत येत आहे. यावर्षी या सेवेसाठी वातानुकुलीत बसेस देणेत येणार आहेत.
या बससेवेचा आगाऊ आरक्षण तिकीट विक्री शुभारंभ शुक्रवार दि.13/10/2023 रोजी सकाळी 10.00 श्री शाहू मैदान पास वितरण केंद्र येथे होणार आहे. या बससेवेसाठी प्रौढास रु.185/- व 3 ते 12 वयोगटातील बालकांना रु.95/- असा दर निश्चीत करणत आलेला आहे. दैनंदिन सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत सदर बससेवेचे आगाऊ आरक्षण पास वितरित करणेत येतील. सोबत जोडले माहितीपत्रकाप्रमाणे दैनंदिन दुर्गादर्शन बससेवेची व्यवस्था करणेत आली आहे. बससंख्येअभावी चालूवर्षी ग्रुप बुकींग सेवा व जादा बसेस बंद ठेवणेत आलेल्या आहेत.
अधिक माहितीसाठी श्री शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्र येथे दुर्गा दर्शन सेवेचे प्रमुख श्री.सुनिल जाधव-9423280719, श्री.सुनिल पाटील-9890080790, ऑफीस 0231-2644566 व 2644568, ए.व्ही.घाटगे – 9764506716, पी.बी.साबळे - 8482838504 यांचेशी संपर्क साधावा.
तरी, कोल्हापूर शहर व परिसरातील भाविक प्रवासी नागरिकांनी या बससेवेचा लाभ घेऊन परिवहन उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन परिवहन उपक्रमामार्फत करणेत येत आहे.
- - - -