हेरले (सिद्धेश्वर देवालय)परिसरात बिबट्याचा वावर
हेरले (ता.हातकणगले) येथील छत्री पाव वडा ते सिद्धेश्वर देवालय परिसराच्या पायथ्याशी बिबट्याचा वावर आढळल्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली असून या बिबट्याचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून मोठ्या प्रमाणात होत आहे.
![]() |
हेरले येथे आढळलेल्या बिबट्यांच्या पावलांचे ठसे |
याबाबत अधिक माहिती अशी की, हेर्ले येथील सिद्धोबा डोंगर परिसराच्या पायथ्याशी लियाकत मुजावर यांचा जनावरांचा गोठा असून या ठिकाणी जनावरांच्या राखणीसाठी कुत्रा पाळण्यात आला आहे. तू कुत्रा गोट्याजवळच असलेल्या गाडीला बांधलेला होता.त्या ठिकाणी रात्रीच्या सुमारास बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून मारुन खाऊन टाकल्या मुळे या
परिसरात एकच खळखळ उडाली आहे.
याबाबत माहिती मिळताच
वनविभागाने ड्रोनच्या साह्याने पाहणी केली असता मादी बिबट्या ड्रोन कॅमेरात दिसून आल्याचे सांगण्यात आले. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यामध्ये घबराट पसरली आहे. याबाबत सरपंच राहुल शेटे व उपसरपंच महंमद बख्तियार जमादार यांनी डोंगर भागात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना डोंगर भागात जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच वनरक्षक एन.एस. पवार व वनपाल एस एस जाधव यांनी शेतकयानी या डोंगर भागात आपली पाळीव जनावरे चरावयास सोडू नये व व आपली जनावरे बंदिस्त ठेवून आपली काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. तसेच वन विभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी घटनास्थळी आपली रेस्क्यू टीम दाखल झाली आहे.