सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेने कार्यरत रहावे : आमदार प्रा.जयंत आसगावकर

Maharashtra Samachar
0

सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ संपन्न

 कोल्हापूर प्रतिनिधी- संभाजी चौगुले

             सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी सुवर्ण काळात सेवा बजावली. सध्या 'ऑनलाईन'मुळे मुख्याध्यापकांना कामाची गती वाढवावी लागत आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शकाच्या भूमिकेने कार्यरत रहावे, असे उदगार शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी काढले.

           विद्याभवन, कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्यावतीने जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या सत्कार समारंभात शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन श्री.बी.जी.काटे होते. 

     यावेळी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.के.ए.देसाई, सौ.शोभा गोडबोले यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी मुख्याध्यापक संघाच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या इ.५ वी ८ वी वर्गासाठी श्रीनिवास रामानुजन गणित प्रविण्य व प्रज्ञा परीक्षा पुस्तकाचे प्रकाशन आम.आसगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

     यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष श्री.एस. डी. लाड, स्व.डी.बी.पाटील विचारमंचचे अध्यक्ष व्ही.जी.पोवार, मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन के.बी.पोवार, बाजार समितीचे माजी उपसभापती श्री.विलास साठे, मुख्याध्यापक महामंडळाचे आजीव सदस्य श्री.डी.एस.पाटील, आश्रमशाळा कृती समितीचे राज्याध्यक्ष श्री.शिवाजी कोरवी,


माजी संचालक श्री. के.के.पाटील, शिक्षक परिषदेचे शहराध्यक्ष श्री. उदय पाटील, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. विष्णू पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. अर्जुन होणगेकर (करवीर), श्री. एस. आर. पाटील (पन्हाळा), श्री. एस. के. पाटील (राधानगरी), श्री. सुरेश पाटील (भुदरगड), श्री.राजेंद्र आर. खोराटे (गडहिंग्लज), श्री.ए.आर.खामकर (कागल), श्री. दिपक एस. लाड (शाहूवाडी), श्री.आर.पी.चौगले (गगनबावडा) मुख्याध्यापक संघाचे जॉइंट सेक्रेटरी श्री.अजित रणदिवे, ट्रेझरर श्री. नंदकुमार गाडेकर, लोकल आडिटर श्री. इरफान अन्सारी, सुरेश उगारे, श्रीकांत पाटील, पी.जी.पोवार, सूर्यकांत चव्हाण, जीवनराव साळोखे, एम.के.आळवेकर, शिवाजी माळकर, पी.बी.भारमल, बबन इंदुलकर, जी.के.भोसले, सखाराम चौकेकर, सौ.पी.के.सरदेसाई, सौ.अनिता नवाळे, एम.जी.पाटील, श्रीधर गोंधळी, कृष्णात पोतदार यांच्यासह आजी, माजी पदाधिकारी, मुख्याध्यापक उपस्थित होते.      

      प्रारंभी स्वागत मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांनी, आभार संघाचे व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर यांनी तर सूत्रसंचालन व्हा.चेअरमन रविंद्र मोरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top