कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम

Maharashtra Samachar
0

के.एम.टी. 'श्री दुर्गादर्शन' विशेष बस सेवेचा शुभारंभ

  

कोल्हापूर प्रतिनिधी- संभाजी चौगुले      

के.एम.टी. उपक्रमामार्फत शारदीय नवरात्रोत्सवाचे कालावधीत भाविक प्रवाशांच्या सोईसाठी सुरु करणेत आलेल्या 'श्री दुर्गादर्शन विशेष बस सेवेचा' शुभारंभ आज रविवार दि.15/10/2023 इ. रोजी श्री शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्र येथे अति. परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांचे शुभहस्ते व  गोमटेश इंग्लिश स्कूलचे व्हाईस चेअरमन प्रशांत पाटील, हॉटेल त्रिवेणी आणि मुरलीचे मालक मनोज पुरोहित यांचे प्रमुख उपस्थितीत करणेत आला.  यावेळी नियमित दुर्गादर्शन बस सेवेच्या प्रवासी सौ.अर्चना शिंदे, शुभांगी म्हामुळकर, रेश्मा कुदळे यांचे शुभहस्ते बसचे पुजन करणेत आले.  या वर्षी 'श्री दुर्गादर्शन विशेष बस सेवे'साठी परिवहन उपक्रमाकडून ताफ्यामध्ये नव्याने दाखल झालेल्या वातानुकुलीत बसेस उपलब्ध करुन देणेत येणार आहेत.

या कार्यक्रमास दुर्गादर्शन प्रमुख सुनिल जाधव, सुनिल पाटील, वाह.निरिक्षक आर.एस.धुपकर, प्रकल्प विभाग प्रमुख पी.एन. गुरव,  कामगार अधिकारी प्रदीप म्हेतर, जनसंपर्क अधिकारी संजय इनामदार, के.एम.टी. लेखापाल अरुण केसरकर,सुसंस्कार हायस्कूल, भोसलेवाडीचे मुख्याध्यापक भोगम सर,  संतोष शिनगारे 

उदय केळसकर, अरुण घाटगे, पुरुषोत्तम सावळे, हेमंत हेडाऊ, सागर वंजारे, विवेक साठे व के.एम.टी.च्या वाहतूक विभागाकडील चालक/वाहक कर्मचारी तसेच वर्कशॉप विभागाकडील कर्मचारी/अधिकारी तसेच भाविक प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या बससेवेसाठी आगाऊं आरक्षण आणि इतर माहितीसाठी के.एम.टी.च्या श्री शाहू मैदान पास नियंत्रण केंद्र येथे स्वतंत्र माहिती कक्ष सकाळी 9.00 ते सायं.4.00 वाजेपर्यंत (फोन 2644566 ते71, 9890080790/8482838504/9764506716) उघडणेत आला आहे. दि.16/10/2023 ते 23/10/2023 अखेर सकाळी 9.00/10.00/11.00/12.00/13.00 या वेळेला एसी बसेस सुटतील.  याचा तिकीट दर प्रौढास रु.185/- व लहानास रु.95/- असा दर राहील.  चालुवर्षी ग्रुप बुकींगसेवा बंद ठेवणेत आली आहे.


तरी, या बस सेवेचा लाभ करवीर नगरीतील बहुसंख्य भाविकांनी घ्यावा असे आवाहन परिवहन उपक्रमातर्फे करणेत येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top