प्रतिनिधी - संभाजी चौगुले
रुकडी (तालुका हातकणंगले) येथील छ. शिवाजी महाराज चौकात आज सकाळी 'वाचन प्रेरणा दिन 'साजरा करणेत आला. थोर शास्त्रज्ञ ,भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दूल कलाम यांचे जयंतीनिमित्त त्यांचे प्रतिमेस माजी सरपंच रघुनाथ जाधव यांचे हस्ते पुष्पहार घालणेत आला.वृत्तपत्र विक्रेते सुनील पाटील यांना शुभेच्छा देणेत आल्या.यावेळी पत्रकार मानसिंग मुसळे, पुंडलिक पोळ,भूपाल मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.